सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेस सोलापुरात दुग्धाभिषेक 

0

सोलापूर,दि.7: सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्या भ्याड हल्ल्याचा सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर निषेध करून भारताचे भूषण असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुधाचा अभिषेक करण्यात आला. 

कोणत्याही जाती धर्मापेक्षा संविधान हे श्रेष्ठ 

लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभापैकी न्यायव्यवस्था हा महत्त्वाचा स्तंभ आहे. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे. कोणत्याही जाती धर्मापेक्षा संविधान हे श्रेष्ठ असून या सनातनी माथेफिरू वकील हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्याच्या वतीने करण्यात आली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here