Sambhaji Brigade On Bribe: दोषी लाचखोर लोकसेवकास तात्काळ सेवेतून बडतर्फ करा

0

सोलापूर,दि .24: Sambhaji Brigade On Bribe: शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामच होत नाही हजारो शासकीय लोकसेवक या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे अशा लोकसेवकास निलंबनाची कारवाई न करता तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करावे तरच शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचारास आळा बसेल, अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडचे निवेदन | Sambhaji Brigade On Bribe

सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्याबाबत माहिती दिली असता, जिल्हाधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न गांभीर्याने घेऊन कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. भ्रष्टाचार हे आपल्या देशाला लागलेली कीड आहे भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती समृद्धी आणि सुशासनाकडे नेतो त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारतची घोषणा केली होती.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या वल्गना केल्या पण याच महाराष्ट्रमध्ये वर्षाला हजारो अधिकारी लाचखोरी करताना सापडलेले आहेत. यात महसूल, शिक्षण, पोलीस, आरोग्य, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे असे ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाचेचे प्रकार घडत आहे.

लाच दिल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत लाखोंचा पगार घेणारे अधिकारी अशा सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे अशा लाचखोर अधिकाऱ्यांना शासनाने निलंबनाची कारवाई न करता डायरेक्ट घरचा रस्ता दाखवावा व तसेच महिला आयोगाच्या धरतीवर लाच प्रतिबंधक आयोग नेमून तात्काळ दोषीवर कारवाई करण्यात यावी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, जिल्हा संघटक रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ननवरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष शेखर चौगुले, लखन गायकवाड, योगेश साठे, दत्तात्रय डिंगणे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here