Home बॉलिवूड Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडीओ व्हायरल, होतेय कौतुक

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडीओ व्हायरल, होतेय कौतुक

0
Reteish Deshmukh

मुंबई,दि.२६: आपल्या दर्जेदार अभिनयासोबतच साध्या अन् नम्र स्वभावासाठी ओळखली जाणारी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखची जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या वर्तुळात आली आहे. कॅफेबाहेर घडलेल्या एका छोट्या पण मन जिंकणाऱ्या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, रितेशच्या खास कृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेमके काय घडले? कॅफेमधून बाहेर पडताना पायऱ्यांवर उभ्या असलेल्या जिनिलियासोबत तेथील सुरक्षारक्षक (सिक्युरिटी गार्ड) सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मोबाईलचा अँगल नीट न जमल्याने त्याची थोडी धावपळ होत होती. ही गोष्ट मागून येणाऱ्या रितेश देशमुखच्या क्षणात लक्षात आली.

कोणताही स्टारडमचा अहंकार न दाखवता रितेशने थेट पुढे होऊन सुरक्षारक्षकाची मदत केली. कॅमेरा कसा धरावा आणि फोटो कसा उत्तम येईल, याचे मार्गदर्शन करत रितेशने त्याला परफेक्ट सेल्फी क्लिक करून दिला.

रितेशच्या या अनपेक्षित आणि आपुलकीच्या वृत्तीने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. “अस्सल कलाकार आणि सच्चा माणूस असाच असतो,” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्याच्या ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावाला मनापासून दाद दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.