लंडन,दि.24: Rishi Sunak: ब्रिटननं भारतावर 150 वर्षाहून अधिक काळ राज्य केलं. त्याच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा व्यक्तीची निवड होणं इतिहासाचा काव्यागत न्याय असल्याचं म्हटलं जातंय. इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सुनक यांना 190 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्याच वेळी, त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट 100 खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शर्यतीतून बाहेर पडल्या.
ब्रिटनचं राजकारण लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा पंतप्रधान होण्यासंदर्भातील शक्यतांचा अंदाज घेत रिंगणातून माघार घेतली होती. ऋषी सुनक यांच्यासमोर आणि पेनी मॉर्डंट यांचं आव्हान होतं. मात्र, पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक आता ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणार आहेत. इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुनक यांनी यापूर्वी अर्थमंत्री म्हणून देखील काम केलं आहे.
सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश-शासित भारतात झाला होता. मात्र, त्यांचे जन्मस्थान पाकिस्तानच्या आधुनिक पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे आहे. अशा प्रकारे नवीन पंतप्रधान भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही आहे. क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने ट्विट केले की, ‘सनक गुजरांवाला यांचे पंजाबी खत्री कुटुंब आहे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये नैरोबीमध्ये लिपिकाच्या नोकरीसाठी गुजरांवाला सोडले.
ऋषी सुनक यांनी करोना संसर्गाच्या काळात ब्रिटनमध्ये चागंलं काम केलं होतं. काही लोकांच्या मतानुसार आर्थिक धोरण ठरवणार नसून देशाच्या हितासाठी आवश्यक असेल ते धोरण मी राबवणार, असं सुनक म्हणाले होते. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या जनतेमध्ये ऋषी सुनक यांची लोकप्रियता वाढली होती.
ऋषी सुनक यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. या कार्यकाळात सुनक यांना देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढायचं आहे. ऋषी सुनक यांच्या आर्थिक धोरणामुळं त्यांना यावेळी रोखण्यात विरोधक देखील अपयशी ठरले.