Loreal कंपनीविरोधात याचिका दाखल, लॉरिअल प्रोडक्ट्स वापरल्याने कँसर?

0

शिकागो,दि.25: Loreal: अनेकजण सौंदर्य प्रसाधने वापरतात. त्यातही ब्रँडेड कंपनीची सौंदर्य प्रसाधने वापरण्यावर भर जास्त असतो. लॉरिअल (Loreal) कंपनीच्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे (Loreal Hair Straightening Products) कर्करोग झाल्याचा दावा करत नुकसानभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. जेनी मिशेल (Jenny Mitchell) या महिलेने फेडरल कोर्टात लॉरियल कंपनीवर नुकसानभरपाईचा दावा केला आहे. या महिलेने Loreal कंपनीवर आरोप केला आहे की, तिने दोन दशकांहून अधिक Lorealचे उत्पादनं (Products) वापरली होती, त्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला ज्यामुळे तिला शस्त्रक्रिया गर्भाशय काढावं लागलं.

Loreal कंपनीवर मिसूरीतील (Missouri) एका महिलेने खटला दाखल केला आहे. लॉरियल कॉस्मेटिक कंपनीच्या (Cosmetic Company) केस सरळ करणाऱ्या उत्पादनांचा (Hair Straightening Products) वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. जेनी मिशेल या महिलेने शिकागो येथील फेडरल कोर्टात शुक्रवारी खटला दाखल केला आहे. एका अभ्यासाचा संदर्भ देत महिलेने हा आरोप केला आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सेफ्टीच्या (NIEHS) अभ्यासात असे आढळून आलं आहे की, केस सरळ करणारी उत्पादने वारंवार वापरणाऱ्यांना गर्भाशयाच्या कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

L’Oreal USA च्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप करत या महिलेने खटला दाखल केला आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्सचा वापर केल्याने गर्भाशयाचा कॅन्सर याबाबत एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. केमिकल हेअर प्रोडक्ट्समुळे गर्भाशयाचा कँसर होण्याचा धोका असतो, असं या अभ्यासात म्हटलं गेलं आहे. हा अभ्यास प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी हा खटला दाखल करण्यात आला आहे.

यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासात असे आढळून आलं की, ज्या स्त्रियांनी केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्स वापरली त्याच्या तुलनेत ज्या स्त्रिया वर्षातून चार वेळा केमिकल हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट असते. गर्भाशयाचा कर्करोग तुलनेने दुर्मिळ आहे, पण अमेरिकेमध्ये, विशेषतः कृष्णवर्णीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या कँसरचे प्रमाण वाढत आहे.

जेनी मिशेल यांचे वकील बेन क्रंप यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कृष्णवर्णीय स्त्रिया बऱ्याच काळापासून धोकादायक उत्पादनांचा बळी ठरल्या आहेत.’ शुक्रवारी पार पडलेल्या खटल्यात बेन क्रंप यांनी जेनी मिशेल यांच्यासाठी लॉरिअलच्या यूएस ब्रांचकडून नुकसान भरपाई मागितली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here