दि.6: रझिया Razia Begum यांचा मुलगा निजामुद्दीन अमान (Nizamuddin Aman) युक्रेनमध्ये एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे आणि आई आता निजामुद्दीनच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे.
रविवारी युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा 11 वा दिवस आहे. रशियन सैनिक युक्रेनमधील प्रत्येक शहरावर हल्ला करत आहेत. सगळीकडे स्फोट होत आहेत, कीव, खार्किव सारखी मोठी शहरे स्फोटांच्या आवाजाने दुमदुमत आहेत. युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये घाबरलेले लोक युक्रेन सोडून जात आहेत.
युक्रेनमध्ये अजूनही अनेक भारतीय अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले आहे. यामध्ये युक्रेनच्या सुमी शहरात एक भारतीय तरुणही अडकला आहे. या तरुणाशी एक विचित्र योगायोग जुळला आहे.
2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागू झाला तेव्हा निजामुद्दीन अमान (Nizamuddin Aman) नावाचा हा तरुण आंध्र-प्रदेश तामिळनाडूच्या सीमेवर अडकला होता. त्यानंतर निजामुद्दीनची आई रझिया (Razia Begum) आपल्या मुलाला आणण्यासाठी 1400 किमी स्कूटी चालवून तेथे पोहोचली होती आणि आपल्या मुलाला तेथून घेऊन आली होती.
तेलंगणातील निजामाबाद येथे राहणारी रझिया आपल्या मुलाला आणण्यासाठी आंध्र प्रदेशातील नेल्लोरपर्यंत स्कूटीवर गेली होती. सुमारे 1400 किमी स्कूटर चालवून रझिया आपल्या मुलाला निजामुद्दीनला घेऊन आली होती. आता रझियाचा मुलगा युक्रेनमध्ये अडकला आहे.
निजामुद्दीन युक्रेनमध्ये घेत आहे एमबीबीएसचे शिक्षण
निजामुद्दीन युक्रेनच्या सुमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एबीबीएसचे शिक्षण घेत आहे. सुमी रशियन सीमेजवळ स्थित आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर रझिया आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. रझिया म्हणाली की निजामुद्दीन बंकरमध्ये बंद आहे आणि त्याच्याशी फोनवर बोलू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, रझिया बेगम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नाही. रझियाने आपल्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.