Ration Shop: नवीन रास्त भाव दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

0

सोलापूर,दि.3: Ration Shop: जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 90 गावांमध्ये विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात आली आहेत. चालविण्यास इच्छुकांनी विहित नमुन्यात संबंधित तहसिलदार यांचे कार्यालय येथे दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

पत्रकात म्हटले आहे, सध्याची रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात येत आहेत.

संबंधित गावातील पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्या गटाला/संस्थेस या गावात रास्तभाव धान्य दुकान परवाना चालविण्याची इच्छा असेल, त्यांनी विहित नमुन्यात संबंधित तहसिलदार यांचे कार्यालय येथे दिनांक 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सदरकामी संबंधित गावातील गटांना/संस्थेला अर्ज करता येईल. अर्ज कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. अर्जदाराने अर्ज स्वतः सादर करावेत. अर्जाचे विहित नमुन्यातील कोरे अर्ज तहसिलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5 च्या चलनाने सरकारी खजिन्यात जमा करुन घेवून दिले जातील.

रास्त भाव दुकान जाहीरनामा सन 2023 तालुका व दुकाननिहाय माहिती पुढीलप्रमाणे | Ration Shop

उत्तर सोलापूर तालुका – मौजे १) नान्नज २) अकोलेकाटी व ३) बीबी दारफळ

माढा तालुका – मौजे १) उपळाई खुर्द व २) भीमानगर

मोहोळ तालुका – मौजे १) शेटफळ २) शिरापूर मो. ३) लांबोटी ४) विरवडे खु., ५) वाघोलीवाडी

माळशिरस तालुका – मौजे १) माळशिरस दु.क्र.६ २) घुलेनगर. ३) फोंडशिरस- दु.क्र.३९ ४) फोंडशिरस दु.क्र.४० ५) दहिगाव ६) कळंबोली ७) अकलूज दु.क्र.६१ ८) अकलूज दु.क्र.६२ ९) अकलूज दु.क्र.६३ १०) अकलूज दु.क्र.६६ ११) माळेवाडी १२) विझोरी १३) बागेचीवाडी १४) गिरझणी १५) संगम १६) गणेशगाव १७) श्रीपूर दु.क्र.१०२ १८) विठ्ठलवाडी १९) खळवे २०) विजयवाडी व २१) भांबुर्डी

करमाळा तालुका – मौजे १) केडगाव २) शेलगाव (वा) ३) कविटगाव, ४) चिखलठाण ५) गुलमोहरवाडी ६) कावळवाडी व ७) बिटरगाव (वा)

पंढरपूर तालुका – मौजे १) करकंब २) सुगावभोसे ३) बिटरगाव ४) पंढरपूर दु.क्र.६९ ५) पंढरपूर दु.क्र.८३ ६) पंढरपूर दु.क्र.८८ ७) कासेगाव व ८) टप्पा

मंगळवेढा तालुका – मौजे १) खडकी २) माळेवाडी व ३) मंगळवेढा

अक्कलकोट तालुका – मौजे १) कुमठे २)कल्लहिप्परगे ३) नन्हेगाव ४) किणी ५) हालचिंचोळी ६) चपळगाव ७) कुरनूर ८) अक्कलकोट दु.क्र. १३ व ९) नागनहळ्ळी

दक्षिण सोलापूर तालुका – मौजे १) कुंभारी २) बिरनाळ ३) राजुर ४) बसवनगर ५) भंडारकवठे ६) सादेपूर व ७) चिंचपूर

बार्शी तालुका – मौजे १) बार्शी दु.क्र.५ २) उपळाई टो.दु. क्र.३६ ३) काळंबवाडी ४) काटेगाव ५) कापसी ६) खडकलगाव ७) गुळपोळी ८) अंबाबाईची वाडी ९) पांगरी दु.क्र.८६ १०) पिंपळगाव (धस) ११) बाभुळगाव १२) बोरगाव १३) तुळशीदासनगर १४) मालवंडी दु.क्र.१०४ १५) बार्शी दु.क्र.१४० १६) बार्शी दु.क्र.१५८ १७) अरणगाव १८) श्रीपतपिंपरी दु.क्र.१६१ १९) पांगरी १८९ २०) उपळाई टो. दु.क्र.१९३ व २१) वाघाचीवाडी

सांगोला तालुका – मौजे १) बंडगरवाडी २) नलवडेवाडी ३) गावडेवाडी व ४) गुणापवाडी

अशी एकूण जिल्ह्यात 90 रास्त भाव दुकाने आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here