अयोध्या,दि.22: भगवान श्रीराम यांच्या नगरीमध्ये अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं.
अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे सजले असून प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाले आहे. आज दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणर आहे. या भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्णपणे रामभक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीतून सुरू आहे. राम मंदिरासाठी देश आणि परदेशातील कोट्यवधी भक्तानी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी कुठल्याही सरकारने एक पैसाही दिलेला नाही. हे मंदिरी पूर्ण पणे भक्त मंडळींनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांतून उभे रात आहे. या मंदिरासाठी सर्वा मोठी देणगी सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले आहे.
सुरतमधील दिग्गज हीरे व्यापारी दिलीप कुमार व्ही. लाखी यांच्या कुटुंबाने अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं देणगी स्वरुपात दिले आहे. याचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने मढवण्यासाठी केला जाणार आहे. या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे.