वीरशैव पंचपीठ महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारीपदी राजशेखर बुरकुले

0

सोलापूर,दि.31: वीरशैव धर्मातील पाच पीठापैकी श्रीकाशी, श्रीउज्जैन, श्रीश्रीशैल व श्रीरंभापुरी जगद्गुरूंच्या आदेशानुसार पंचपीठाच्या महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारीपदाचे नियुक्तीपत्र राजशेखर बुरकुले यांना देण्यात आल्याची आल्याची माहिती पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्रामप्पा अलगुडकर यांनी दिली.

बुधवारी कलबुर्गी येथील कडगंची मठातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्रीकाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विरभद्र शिवाचार्य (कडगंची) अभिनव राचोटेश्वर शिवाचार्य (सोमवारपेटे), श्री पंपापती देवरू (सुलेपेठ), ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य (कडबगाव), पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्रामप्पा अलगुडकर, महादेव अलगुडकर, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, वीरशैव व्हिजनचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, शिवानंद येरटे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीकाशी जगद्गुरु म्हणाले की राजशेखर बुरकुले यांनी काशीपीठाची आजपर्यंत मनोभावे सेवा केली आहे. त्यांचे सेवा कार्य पाहून आम्ही सर्व जगद्गुरूंशी चर्चा करून यापुढील काळात त्यांनी पाचही पीठांची सेवा करावी. या उद्देशाने आम्ही त्यांची निवड आज केलेली आहे. ती जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे त्यांना मंगल आशीर्वाद आहेत.

राजशेखर बुरकुले यांना मिळालेले हे पद सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले आहे. वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून राजशेखर बुरकुले यांनी सामाजिक शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. तसेच ते आतापर्यंत श्रीकाशीपीठाच्या प्रसिद्धी विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

यावेळी बोलताना राजशेखर बुरकुले म्हणाले की मी आजपर्यंत समाजाची, धर्माची सेवा करत आलो आहे. यापुढील काळात पंचपीठांची प्रसिद्धी विभागाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सेवा प्रामाणिकपणे बजावणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here