Rahul Gandhi | राहुल गांधी यांचा सावरकर मानहानी प्रकरणात मोठा दावा

0

सोलापूर,दि.२९:  Rahul Gandhi On Savarkar Defamation Case | राहुल गांधी यांनी सावरकर मानहानी प्रकरणात मोठा दावा केला आहे. सावरकर मानहानी खटल्यात काँग्रेस नेते आणि लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना एक नवीन दावा केला आहे. काँग्रेस नेत्याने पुण्यातील विशेष MP/MLA (खासदार/आमदार) न्यायालयात अर्ज दाखल केला आहे आणि तक्रारदारावर महत्त्वाची तथ्ये लपवल्याचा आरोप केला आहे. 

राहुल गांधी यांचा मोठा दावा | Rahul Gandhi On Savarkar Defamation Case 

राहुल गांधींचा (Rahul Gandhi) असा दावा आहे की त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणारे सात्यकी सावरकर हे प्रत्यक्षात नथुराम गोडसे कुटुंबातील आहेत. या प्रकरणात तक्रारदार सत्यकी सावरकर यांचा संबंध महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या कुटुंबाशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Rahul Gandhi On Savarkar Defamation Case

विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, सात्यकी सावरकर यांनी सादर केलेली वंशावळ फक्त एकाच बाजूची आहे. सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या तक्रारीत फक्त वडिलांकडील वंशावळ सादर केले आहे परंतु आईकडील वंशावळ दिलेले नाही. 

सत्यकी सावरकर हे नथुराम गोडसे यांचे धाकटे भाऊ गोपाळ विनायक गोडसे यांचे नातू आहेत. तक्रारदाराने जाणूनबुजून आणि पद्धतशीरपणे” आपल्या वंशावळीचा खुलासा केला नसल्याचा दावाही राहुल गांधींनी केला आहे.

सात्यकी हा गोपाळ गोडसे यांच्या मुलीचा मुलगा आहे ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली नाही. राहुल गांधींनी न्यायालयाला विनंती केली आहे की, तक्रारदाराला त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश द्यावेत. 

राहुल गांधी यांनी न्यायालयात असा दावा करून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे की सात्यकी सावरकर यांनी न्यायालयाला सांगितले आहे की ते विनायक दामोदर सावरकरांच्या कुटुंबातील आहेत, परंतु त्यांची माहेरची बाजू महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसेच्या कुटुंबाशी थेट जोडलेली आहे ही माहिती लपवली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here