सोलापूर,दि.4: Rahul Gandhi On Lok Sabha Result: लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या ट्रेंडनुसार, इंडिया ब्लॉकला 231 जागा आणि NDA आघाडीला 294 जागा मिळत आहेत. इंडिया ब्लॉकमध्ये काँग्रेस 98 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा जनादेश पीएम मोदींच्या विरोधात आहे.
काय म्हणाले राहुल गांधी? | Rahul Gandhi On Lok Sabha Result
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, इंडिया ब्लॉक आणि काँग्रेसने ही निवडणूक केवळ एका राजकीय पक्षाविरुद्ध लढवली नाही, तर आम्ही ही निवडणूक भाजप, सर्व संस्था, सीबीआय, ईडी यांच्याविरुद्ध लढवली. कारण या संस्था मोदी सरकारने काबीज केल्या होत्या. हा लढा संविधान वाचवण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. भाजपने आमची बँक खाती जप्त केली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, पक्ष फोडले, तेव्हा देशातील जनता आपल्या संविधानासाठी एकत्र उभी राहील, असे मनात होते. हा विचार खरा ठरला.
देशातील जनतेने संविधान वाचवण्यासाठी सर्वात मोठे आणि पहिले पाऊल उचलले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने या निवडणुकीत इंडिया ब्लॉकच्या भागीदाराचा आदर केला. त्यांना सोबत घेतले. जिथे युती झाली तिथे आम्ही एकत्र लढलो. काँग्रेसने देशाला नवी दृष्टी दिली आहे.
सरकार स्थापन करण्याचा दावा करणार का?
निकालानंतर सरकार स्थापन करणार की विरोधी पक्षात बसणार या प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, याबाबत उद्या निर्णय घेतला जाईल. यावर आमची युती उद्याच निर्णय घेईल. इंडिया आघाडी जो काही निर्णय घेईल, त्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे राहुल गांधी यांनी देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना तुम्ही आम्हाला नको आहेत असा संदेश दिला आहे. ते म्हणाले की, संविधान वाचवण्याचे काम देशातील गरीब जनतेने केले आहे. कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासवर्गीयांनी संविधान वाचवले आहे.