Rahul Gandhi Defamation Case: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया म्हणाले…

0

नवी दिल्ली,दि.24: Rahul Gandhi Defamation Case: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राहुल गांधी यांनी दिली प्रतिक्रिया | Rahul Gandhi Defamation Case

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. याच कायद्यानुसार, राहुल गांधी यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर अखेर त्यांनी ट्विट केले- मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं। (मी भारताच्या आवाजासाठी लढतो आहे, मी त्यासाठी कितीही मोठी किंमत चुकवायला तयार आहे.)

दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here