नवी दिल्ली,दि.11: काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांचे व्हिजन एका समान व्यासपीठाद्वारे सर्वांसमोर मांडणे हा सकारात्मक उपक्रम असेल. लोकसभा निवडणुकीवरील सार्वजनिक चर्चेसाठी दोन माजी न्यायाधीश आणि एका प्रतिष्ठित नागरिकाच्या निमंत्रणाचे त्यांनी स्वागत केले.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशाला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत सहभागी होतील.
न्यायमूर्ती (निवृत्त) मदन बी लोकूर, न्यायमूर्ती (निवृत्त) अजित पी शहा आणि एन राम यांना उत्तर देताना काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारते, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे, अशी देशाची अपेक्षा आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला दोन माजी न्यायाधीश आणि एन राम यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चेसाठी व्यासपीठावर आमंत्रित केले होते.