Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले केंद्रात कोणाची येणार सत्ता

0

सोलापूर,दि.21: देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. तर महाराष्ट्रात शेवटचा टप्प्याचे (पाचवा टप्पा) मतदान काल (दि.20) झाले. देशात अजून दोन टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच केंद्रात कोणाची सत्ता येणार? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी NDTV ला (एनडीटीवी) दिलेल्या मुलाखतीत मोठे भाकीत केले आहेत. 

एनडीटीवी दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाला काय असेल यावर भाष्य केले आहे. शिवाय विरोधी पक्षाबाबतही आपली मतं मांडली आहे. केंद्रात कोणाचे सरकार येईल याचेही भाकीत केले आहे. 

केंद्रात कोणाची सत्ता येणार? | Prashant Kishor

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मते, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल. त्यांच्या मते देशात मोदीविरोधी लाट दिसत नाहीये. मोदींच्या नावावर भाजप ही निवडणूक जिंकणार आहे. 

देशात भाजपाविरोधात नाराजी?

देशात सध्याच्या स्थिती लोकांमध्ये काही गोष्टींसाठी नाराजी आहे. पण मोठ्या प्रमाणात असंतोष आहे अशी स्थिती नाही. शिवाय दुसरं कोणी आलं तर परिस्थिती सुधारेल, म्हणजे राहुल गांधी आले तर परिस्थिती सुधारेल अशी ही भावना जनतेत नाही. असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशांत किशोर (PK) यांनी सांगितले की आकड्यांचा विचार करता देशातल्या जवळपास सव्वा तिनशे जागा अशा आहेत ज्यावर भाजप आणि एनडीएची स्थिती मजबूत आहे. त्यातील नव्वद टक्के जागा ते पुन्हा मिळवतील. पण सव्वा दोनशे जागा अशा आहेत ज्या ठिकाणी भाजपचे प्रदर्शनहे हे चांगले झालेले नाही असेही ते म्हणाले. असं असलं तरी पश्चिम आणि पुर्व भारतात भाजपला नुकसान होताना दिसत नाही.

पीके यांच्या म्हणण्यानुसार, 400 आणि 370 चा आकडा पार करण्याचा नारा हा केवळ भाजपचा निवडणूक खेळ आहे. विरोधकांना हे समजू शकले नाही आणि ते चांगलेच गोंधळले. 

प्रशांत किशोर सांगतात की उत्तर आणि पश्चिम भागात लोकसभेच्या जवळपास 325 जागा आहेत. हा भाग 2014 पासून भाजपचा बालेकिल्ला आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे पश्चिम आणि उत्तरेत फारसे नुकसान झाल्याचे दिसत नाही. 

प्रशांत किशोर (PK) म्हणाले पूर्व आणि दक्षिणमध्ये जवळपास 225 जागा आहेत. सध्या या राज्यांमध्ये भाजपकडे 50 पेक्षा कमी जागा आहेत. यापूर्वी या ठिकाणी भाजपची कामगिरी चांगली नसली तरी या निवडणुकीत ओडिशा, तेलंगणा, बिहार, आंध्र, बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याऐवजी वाढतील. येथे पक्षाला एकूण जागांपैकी 15-20 जागांचा फायदा होताना दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here