सोलापूर,दि.21: Prashant Kishor On BJP: भाजपाच्या (BJP) विरोधात विरोधी पक्ष एकवटलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केला. सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपा सत्तेतून जाऊ शकते असे म्हटले जात आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सांगितले की 2024 मध्ये भाजपच्या विरोधात विरोधी एकजूट कधीच काम करणार नाही. कारण ते अस्थिर आणि वैचारिकदृष्ट्या भिन्न असेल. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा फारसा फायदा होईल असे वाटत नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले की, विरोधी एकजूट म्हणजे दिखाऊपणा असून केवळ पक्ष किंवा नेत्यांना एकत्र आणून ते शक्य होणार नाही. (Prashant Kishor On Lok Sabha Election 2024)
काय म्हणाले प्रशांत किशोर? | Prashant Kishor
प्रशांत किशोर यांनी NDTV ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, “भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद, त्यांची बलस्थानं काय आहेत? याचाच अर्थ हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना आव्हान द्यावं लागेल” प्रशांत किशोर पुढे असं म्हणाले की “हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक आहे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल.”
अशा पद्धतीने भाजपाला हरवता येणार नाही | Prashant Kishor On BJP
प्रशांत किशोर म्हणाले, “मी सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.” राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावे 2014 च्या निवडणुकांमध्ये अनेक विजय आहेत. प्रशांत किशोर सध्या जन सुराज यात्रेत बिहारचा दौरा करत आहेत.
राजकारणात प्रशांत किशोर यांना पीके या नावानेही ओळखलं जातं. बिहारबाबत ते म्हणाले की , “बिहारचं राजकारण हे अनेक चुकीच्या समजुतींसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जातीपातींमध्ये अडकलेलं आहे. आत्ता आम्ही असा प्रयत्न करत आहोत की इथे लोक काय करू शकतात? ते किती सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखला जाईल.”
भारत जोडो यात्रेवरही भाष्य | Prashant Kishor On Lok Sabha Election 2024
“राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली ती फक्त चालण्याशी संबंधित नव्हती. मागच्या सहा महिन्यांत राहुल गांधीवर टीकाही झाली आणि त्यांची स्तुतीही करण्यात आली. तुम्ही जेव्हा सहा महिने चालता, भारत जोडोसारखी यात्रा काढता त्यावेळी तुम्हाला पक्षामध्ये काही बदल झालेले दिसले पाहिजे. ही यात्रा काँग्रेसचं भवितव्य ठरवणारी आहे. माझ्यासाठी यात्रा म्हणजे मिशन नाही तर ज्या भागात ती जाते तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न आहे.” असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.