सोलापूर,दि.10:Praniti Shinde On Modi: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. सोलापुरात काँग्रेसच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्थिर सरकार व्यवस्थितपणे देण्यात भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शहांच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाले आहे. काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठेच जात नाही आहोत आणि येणाऱ्या काळात खंबीरपणे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहोत. काँग्रेस पक्षाने खूप सत्तेचे दिवस बघितलेले आहेत आणि आम्ही लालची नाही आहोत, परंतू मोदींमध्ये लालचीपणाची भावना दिसून येत आहे. खोटं बोलण्याची ही वृत्ती आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे? | Praniti Shinde On Modi
मोदी अमेरिकेला गेले आणि म्हणाले,”हमारे देश में लोकशाही कायम है, और हमारे यहा जातिवाद होता नही है”. मणिपूर तिकडे जळत आहे, ठिकठिकाणी दंगली पेटवायचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे मला सोलापूरकरांच अभिनंदन करावसे वाटतेय. भाजपने इकडे फ्रंट म्हणून दुसऱ्याला ठेऊन षडयंत्र रचलेले. 2024 इलेक्शन येत आहे सावध रहा, ते आपल्या रक्तावरपण राजकारण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात तो प्रयत्न चालू आहे. औरंगाबादमध्ये तो चालू होता, सोलापूरमध्ये चालू आहे. मात्र, सोलापूरकर या गोष्टींना बळी पडले नाहीत त्यामुळं त्यांचं मनापासून स्वागत करायचं आहे. सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही जिवंत आहे. मोदींच्या या गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका. भाजपची ही जी कीड देशाला लागलेली आहे ती कायमस्वरूपी नष्ट करूयात, असे शिंदे म्हणाल्या.
मोदीच्या विरोधात बोलतो याचा मला अभिमान आहे
देवेंद्र फडणवीस यांची ही मोडस ऑपरेंडी आहे, ईडीच्या माध्यमातून कारवाई करा आणि मग त्यांना आपल्या पक्षात आपली बाजू वाढवण्यासाठी घ्या. मोदीच्या विरोधात बोलतो याचा मला अभिमान आहे. कारण आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही जनतेसाठी काम करतो. आम्ही काय केलेय एवढे की त्यामुळे इडी आमच्या मागे लागेल. काँग्रेस फोडण्याचा ते प्रयत्न करतील पण काँग्रेस फुटणार नाही उलट आमच्याकडे इनकमिंगच होत आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, त्यांच्याकडे सक्षम लोक नसतील त्यामुळं ते काँग्रेस मधील सक्षम लोकांना पोर्च करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.
वारंवार कोर्टामध्ये दबाव वापरून राहुल गांधींच्या स्टे साठी कोर्टामध्ये केलेले अपील खारीज करण्यात आलेले आहे. मोदींकडून आणि भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर वापरले जातात. इडीच्या भीतीमुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आलेत, पण एक स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही. राहुल गांधींच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र चालू आहे मात्र, याचा राहुल गांधींना काहीही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा पत्रकार पण आंदोलनामध्ये सहभागी होतात, तेव्हा खरंच डोळे उघडले जातात आणि लोकशाहीचं खच्चीकरण दिसून येतं. राहुल गांधींच्या तेलंगणाच्या सभेत पाच लाखापेक्षा जास्त लोक जमली होती,तेलंगणा मध्ये आता काँग्रेसचे सरकार येणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.