मुंबई,दि.१२: प्रकाश आंबेडकर यांनी PM मोदी आणि मनोज जरांगेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढत आहे. वंचितने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. प्रचारही सुरू केला आहे. मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू केले होते. लोकसभा निवडणुकीत शेकडो उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला होता.
मात्र मनोज जरांगे यांनी तो निर्णय रद्द केला. मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे. मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, तर नाही. अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही, अशी परिस्थिती आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
मनोज जरांगे यांच्या पाठिशी किती टक्के मराठा समाजातील मतदार आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकेल, याबाबत आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा मनोज जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे, असा थेट आकडा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला.