वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांनी केली अजित पवार यांच्यावर टीका

0

पुणे,दि.15: वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे. ‘वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजराजला जाण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. पण, हा वाद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना सगळी माहिती असेल, त्यांनी या प्रकल्पासाठी क्लोजर रिपोर्ट का दिला नाही, असा गंभीर आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजराजला जाण्यावरून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधला आहे. मविआ सरकार असताना अजित पवारांनी या प्रोजेक्टचा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही. या प्रकल्पला 12 हजार कोटींची सबसिडी म्हणा किंवा बेनिफीट देणार होते. तर दुसरीकडे 26 हजार कोटी वार्षिक उत्पन्न होईल, असं सांगितलं जात आहे. पण या ज्या नऊरत्न कंपन्या आहे, या कंपन्यांचं जेवढं उत्पन्न आहे, अजून केंद्राला सुद्धा नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गुजरातला गेलं होतं. त्यामुळे नवीन काही नाही. जिथे जिथे फडणवीस असतील तिथे हे प्रश्न येतील. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा अर्धे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

‘राष्ट्रवादी सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्र आणि साखर उद्योगाच्या पलिकडे विचारच करत नाही. महाविकास आघाडी सरकार असताना फॉक्सकॉन प्रकल्पाला तात्काळ क्लोजर का केला नाही, असा परखड सवालही आंबेडकर यांनी विचारला.

‘हा प्रकल्प नक्की महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लघू उद्योग आले पाहिजे, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला मोठा हातभार लाभेल’, असंही आंबेडकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here