Maharashtra: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

Maharashtra: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष उद्या सुनावणी होणार

0

नवी दिल्ली,दि.14: Maharashtra: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालायच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजची (14फेब्रुवारी) सुनावणी संपली आहे. शिवसेना कुणाची ? या प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले. (Maharashtra News) या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुमारे 4 तास सुनावणी पार पडली. आज शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनु सिंघवी, वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. उद्या (15 फ्रेब्रुवारी ) याप्रकरणी नियमीत सुनावणी पार पडणार आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू झाली. यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी साळवे यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे. युक्तीवादात प्रामुख्यानं अरुणाचल मधील नबाम रेबिया प्रकरण आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यातला फरक त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here