Mahesh Hanme: खंडणी प्रकरणात महेश हणमेला पकडताना पोलिसांकडून गोळीबार

0

सोलापूर,दि.19: Mahesh Hanme: खंडणी प्रकरणात महेश हणमेला पकडताना पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला.

महेश हणमेने मागितले होते पाच कोटी रुपये | Mahesh Hanme

दोघा खंडणीखोरांना खंडणी विरोधी पथकाने पकडले असून त्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे अशी त्यांची नावे आहेत, महेश सौदागर हणमे (Mahesh Saudagar Hanme) व दिनेश हणमे (Dinesh Hanme) (दोघे रा. सोलापूर) अशी पकडलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी येथील एका व्यावसायिकाला महेश हणमे हा पत्रकार असल्याचे सांगून खोट्या बातम्या देऊन बदनामी करतो, अशी ऑगस्ट 2012 पासून धमकी देत होता. तसेच खोट्या पोलिस केसमध्ये अडकविण्याची धमकी देत होता.

यवत टोलनाक्याजवळ सापळा रचला. फिर्यादी यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून यवतजवळ बोलावले. फिर्यादी यांच्याबरोबर गाडीत साध्या वेशात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण होते. हणमे याला संशय आल्याने त्याने फिर्यादींना खाली बोलावून घेत शिवीगाळ केली. त्याचवेळी दुसऱ्या एकाने गाडी चालू करुन पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाली उतरलेले चव्हाण यांनी बाजूला उडी मारत स्व:चा बचाव केला. आपल्याकडील पिस्टलमधून दोन गोळ्या टायरवर फायर केल्या. पळून जाणाऱ्यांना पकडताना सुरेंद्र जगदाळे हे जखमी झाले आहेत.

पाठोपाठ आलेले पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव व सचिन अहिवळे, विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, पवन भोसले, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे यांच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडले. याबाबत यवत पोलिसाना माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आतापर्यंत 3 लाख 80 हजारांची खंडणी उकळली

महेश हणमे याने फिर्यादीकडून आतापर्यंत 3 लाख 80 हजार रुपये खंडणी उकळली आहे. तरीही तो सातत्याने खंडणी मागत होता. पैसे देतात म्हटल्याने त्याने त्यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यांना तातडीने 50 लाख रुपये घेऊन मोहोळ येथे बोलावले होते. याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांना त्याने आज लोणी काळभोर येथे बोलावले होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळ्याचे आयोजन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here