Sanjay Raut On MVA: लोकसभा जागा वाटपाबाबत संजय राऊत यांचे महत्वाचे विधान

0

मुंबई,दि.19: Sanjay Raut On MVA: लोकसभा जागा वाटपाबाबत संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. मविआमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. असे असताना मविआचा लोकसभेसाठी 16-16-16 जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले… | Sanjay Raut On MVA

बाहेर सुरु असलेली बातमी चुकीची आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मविआमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे.  आमचे 19 खासदार लोकसभेत राहतील, असे राऊत यांनी सांगितले. 

गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात 18 जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे 19 खासदार असतील, असे राऊत म्हणाले. 

सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या घटनेवर राऊतांनी बीडमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नेत्या आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यामुळे तात्काळ कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

भाजपाच्या कार्यकारणीच्या सभेतील फोटो पाहिले तर…

भाजपाच्या कार्यकारणीच्या सभेतील फोटो पाहिले तर कोणी झोपलेय, कोणी जांभया देतेय कोणी आणखी काय करतेय. अशा मरगळलेल्या लोकांसमोर फडणवीस आम्हाला कसले पोपट मेल्याचे टोले देत होते, अशी टीका राऊत यांनी केली. विधानसभा अध्यक्ष महात्मा आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कायदेशीर निकालाची आम्हाला अपेक्षा आहे. फडणवीस म्हणत होते, पोपट मेलाय, आता पोपट कुणाचा उडतोय हे दिसेल. वाघाचे बोलताय ते महापालिकेची ताबडतोब निवडणूक घ्या, मग बघा. बालाजी कल्याणकर हे सरपंच व्हाय़च्या लाय़कीचे नव्हते, त्यांना शिवसेनेने आमदार केले, अशी टीका राऊत यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here