“मी मनुष्य आहे देव थोडीच आहे, माझ्याकडूनही चुका…” पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

सोलापूर,दि.10: “मी मनुष्य आहे देव थोडीच आहे, माझ्याकडूनही चुका होतात” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सांगितले की हे त्यांचे पहिले पॉडकास्ट आहे, ज्यामध्ये ते अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने बोलले. पॉडकास्टचा व्हिडिओ रिलीज करण्यापूर्वी निखिल कामथने दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये निखिल हे पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत, ज्यांची उत्तरे पंतप्रधान देत आहेत.

व्हिडिओमध्ये निखिल पंतप्रधान मोदींना विचारतात की, जर एखाद्या तरुणाला नेता बनायचे असेल, तर अशी कोणतीही प्रतिभा आहे का ज्याची चाचणी घेता येईल. या प्रश्नाला उत्तर देताना पीएम मोदी म्हणतात की, चांगल्या लोकांनी राजकारणात येत राहिले पाहिजे. असे लोक जे महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन येतात. पीएम मोदी पुढे म्हणतात की, जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाषण केले होते. मग ते जाहीरपणे म्हणाले, ‘चुका होतात. माझ्याकडूनही असे घडते. मी पण माणूस आहे, मी देव नाही.’

पॉडकास्टमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना जगात सुरू असलेल्या युद्धाबाबतही विचारले. निखिल यांनी पंतप्रधानांना विचारले की आपण जगात काय चालले आहे याची काळजी करावी का? यावर पीएम मोदी म्हणाले की, या संकटाच्या काळात आम्ही तटस्थ नसल्याचे सातत्याने म्हणत आलो आहोत. ते म्हणाले, ‘मी शांततेच्या बाजूने आहे, असे मी सतत सांगत असतो.’ 

पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय फरक आहे?

प्रश्नांची मालिका सुरू ठेवत, निखिल पंतप्रधान मोदींना विचारतात की त्यांची पहिली आणि दुसरी टर्म एकमेकांपेक्षा कशी वेगळी होती. या प्रश्नाचे उत्तर देताना पीएम मोदी म्हणतात की, पहिल्या टर्ममध्ये लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि मीही दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here