पिंपरी चिंचवड,दि.30: दुकानाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड मधील चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटे येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्यासही अवधी मिळाला नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे.
आगीत होरपळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
चिमणाराम बेणाराम चौधरी वय 48, नम्रता चिमणाराम चौधरी वय 40, सचिन चौधरी (वय-10) भावेश चौधरी (वय-15) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहे. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागली. याच हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.
पिंपरी चिंचवडमधील भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. चौधरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. याच दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंबीय राहत होतं. दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला. आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानचं हे कुटुंब हार्डवेअरचं दुकान चालवायचं आणि दुकानाच्या माळावर राहत होते. .