परभणी,दि.11: Parbhani Accident: विद्यार्थ्यांच्या सहलीची बस आणि एसटी बसच्या भीषण अपघात 22 जण जखमी झाले आहेत. परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या सहलीची बसची आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 22 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Parbhani Accident: कसा झाला अपघात?
गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोरच धडक झाली. ज्यात दोन्ही बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. अपघातग्रस्त बसमधील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या अपघातात 10 ते 15 वर्षाचे 3 विद्यार्थी जखमी आहेत. नेमका अपघात कुणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप कळले नसून घटनेचा तपास पिंपळदरी पोलीस करत आहेत.