पेंट फॅक्टरीला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

0

नवी दिल्ली,दि.16: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आगीची भीषण घटना समोर आली आहे. दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

मृतांपैकी बहुतेकांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यांचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. मृत हे कारखान्यातच मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागली तेव्हा ते विझवण्यात व्यस्त होते. दरम्यान, रंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला. कारखान्याला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखान्यात शोधमोहीम सुरू आहे.

दाट लोकवस्तीचा परिसर

दिल्लीतील अलीपूर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या गजबजलेल्या परिसरात रंगाचा (पेंट) कारखाना सुरू होता. गुरुवारी सायंकाळी येथे आग लागली आणि केमिकलमुळे आग वाढतच गेली आणि पसरत गेली. त्यामुळे कारखान्यात उपस्थित लोकांचा होरपळून मृत्यू झाला. याआधी तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र रात्री उशिरा आलेल्या अपडेटमध्ये 11 जणांचा दगावल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. 

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत जळालेल्यांची ओळख पटू शकली नाही. आगीत भाजलेल्या काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचा जागीच मृत्यू झाला. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

राजधानी दिल्लीतील गजबजलेल्या निवासी भागात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. २६ जानेवारीलाही दिल्लीतील शाहदरा भागातील एका रबर कारखान्यात आग लागली होती. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5.22 वाजता येथे आग लागली, त्यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 2 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत दोन जण जखमी झाले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here