बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन

0

सोलापूर,दि.27: जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांचे मार्फत जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दि.29 डिसेंबर 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कनिष्ठ कौशल्य विकास,रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी द.क.देवळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

सोलापूर जिल्हयातील नोकरीइच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या रोजगार मेळाव्यात 10 वी 12 वी ग्रॅज्युएट , नर्सिंग पदवी अशा एकूण 530 पेक्षा जास्त रिक्त पदे 4 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केले आहेत.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध् रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल . याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर येथे प्रत्येक्ष भेटीव्दारे अथवा 0217-2950956 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही कनिष्ठ कौशल्य विकास,रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी देवळे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here