दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक, सोलापुरातील तरुणाची फसवणूक

0

सोलापूर,दि.९: घरातील जुने फर्निचर (Old furniture) विकण्यासंबंधी ओएलएक्स ॲपवर (OLX App) जाहिरात दिल्यानंतर भामट्यांनी तरुणाच्या बँक खात्यामधून दोन लाखांची रक्कम काढून घेऊन ऑनलाइन फसवणूक केली आहे.

याबाबत सुशांत वीरेंद्र गांधी (वय २८, रा. पार्श्वनाथ अपार्टमेंट, बुधवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाइल ९३३६७३८०९२ धारकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने त्यांच्या घराचे जुने फर्निचर विकण्यासंबंधी ओएलएक्स ॲपवर जाहिरात टाकली होती. ती जाहिरात पाहून आरोपीने फिर्यादीस फोन तसेच व्हॉट्सॲपवरून जुने फर्निचर खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती.

आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर एक क्यूआर कोड पाठवून त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले, तुमच्या अकाउंटला पैसे परत येतील, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर फिर्यादीने पाठवलेल्या क्यूआर कोडचा वापर करून फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ९२ हजार ५०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दत्तात्रय पोळ हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here