भीषण अपघातात अभिनेत्री आंचल तिवारीसह नऊ जणांचा मृत्यू

0

कैमूर,दि.27: भीषण अपघातात अभिनेत्री आंचल तिवारीसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील कैमूर येथे सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार उगवत्या कलाकारांनाही आपला जीव गमवावा लागला.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत ठार झालेल्या नऊ जणांमध्ये भोजपुरी गायक छोटू पांडे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. याशिवाय भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांनाही या रस्ता अपघातात जीव गमवावा लागला आहे.

मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी सांगितले की, सोमवारी मृतांची ओळख पटली असून भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे यांचाही समावेश आहे.

आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागिश पांडे अशी अन्य मृतांची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह आठ जणांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने आधी मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला.

यानंतर, एसयूपी आणि दुचाकी दोघेही दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यानंतर मोटारसायकल चालकासह सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here