Nilesh Rane On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांच्याबाबत निलेश राणे यांचं मोठं विधानं

0

मुंबई,दि.५: Nilesh Rane On Sanjay Raut: ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजपचे नेते एकापाठोपाठ एक प्रतिक्रया देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी नेहमीप्रमाणे तिखट शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर प्रहार केला. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी त्यांची सुटका होणार नाही. संजय राऊत यांचा काळा पैसा बाहेर आला आहे. आता संजय राऊत यांना अटक होणारच, असे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.संजय राऊत हा चोर आहे. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी आयकराचे पैसे बुडवले होते. तेव्हा संजय राऊत यांना ५५ लाख रुपये परत द्यावे लागले. ते पैसे कशासाठी होते. तेव्हा काय संजय राऊत यांना वारीत पकडलं होतं का? आताही ईडीला पैशांचा माग (ट्रेल) सापडला असेल. त्यानुसार रितसर ही कारावाई झाली आहे. संजय राऊत यांना नोटीस देऊनही ते ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. आता ते अशी कोणतीही नोटीस आलीच नाही, असे सांगत आहेत. मात्र, ईडीच त्यांना किती नोटीस पाठवल्या होत्या, हे जाहीर करेल, असे निलेश राणे यांनी म्हटले. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी यामधून त्यांची सुटका होणार नाही. संजय राऊत म्हणतात हा मेहनतीचा पैसा आहे. पण संजय राऊत मेहनतीचा पैसा कुठून आणणार. संजय राऊत ‘सामना’मध्ये काम करतात. तिथून हा पैसा येतो का, असा सवालही निलेश राणे यांनी विचारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here