सोलापूर,दि.१८: राष्ट्रवादीने भाजपा नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. राष्ट्रवादीने X वर व्हिडीओ शेअर केला आहे. देशात सध्या अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशातील मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात मंत्री, आमदार व भाजपा नेते मंदिर व इतर रहिवाशी भागात स्वच्छता अभियान राबवत आहेत. यासर्व स्वच्छता अभियानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत आहेत.
गुजरातमधील एका भाजपा नेत्याचा स्वच्छता करतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादीने शेअर केला आहे व ‘सब गंदा है पर धंधा है यह’ असे कॅप्शन दिले आहे. राष्ट्रवादीने शेअर केलेल्या व्हिडीओत हा नेता एका हाताने कचरा जमिनीवर टाकतानाही दिसून येत आहे. नंतर दुसऱ्या हाताने झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसत आहेत.
स्वत:च्या घरी तरी कधी कचरा काढला होतात का राव ? इकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी साहेब कचरा काढतायत, काय वेळ आलीये यांच्यावर! अरे…जनता मूर्ख नाही रे…प्रत्येक वेळेला तुम्ही फोटो काढणार आणि मिडियाला आणणार. येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा. असे राष्ट्रवादीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.