NCP Karnataka: भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा

0

मुंबई,दि.15: NCP Karnataka: भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुढील महिन्यात कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात | NCP Karnataka

एवढेच नाही, तर भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. हरी आर म्हणाले, “आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत. बेंगळुरूचे (माजी) महापौरही लवकरच आमच्या पक्षात सामील होऊ शकतात.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 14 जागांवर निवडणूक लढवली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली असून त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होनार असून 13 मे रोजी मतमोजनी होईल.

काँग्रेसने जाहीर केली यादी

राजीनामा दिलेल्या भाजपा नेत्यांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) उमेदवार यादी (Candidate List) जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) नाराजी असल्याची चर्चा आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं म्हटलं जात आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ माजली असून राजीनाम्यांचा पाऊस होत आहे, असा दावा काँग्रेसने (Congress) केला आहे. सोबतच कर्नाटकातील भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांची यादी देखील दिली आहे. यात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे निकवर्तीय डॉ. विश्वनाथ, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

ट्विट करत नावे केली जाहीर

• लक्ष्मण सवदी, माजी उपमुख्यमंत्री
• डीपी नरीबोल, माजी आमदार
• एम पी कुमारस्वामी, आमदार
• रामाप्पा लमाणी, आमदार
• गुलिहाटी शेखर, आमदार
• शंकर आर, एमएलसी
• एस. अंगारा, मंत्री
• येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्वनाथ


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here