Nawab Malik: महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक

0

मुंबई,दि.23: Nawab Malik arrested: महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘मला अटक झाली आहे, पण मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू.

विशेष म्हणजे आज अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी सकाळी 6 वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते जिथे त्यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आली. घरात चौकशी केल्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले, सकाळी साडेआठ वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयातही चौकशी करण्यात आली.



अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना कथित अंडरवर्ल्ड संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. ED ने 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्ड गतिविधि, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर मलिक यांची चौकशी करण्यात आली. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकीलच्या नातेवाईकासह 10 ठिकाणी तपास यंत्रणेने छापे टाकले होते. आधीच कारागृहात असलेल्या कासकरला गेल्या आठवड्यात एजन्सीने अटक केली होती. पारकर याच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here