या दिवशी होतो सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून आली माहिती समोर

0

नवी दिल्ली,दि.25: शास्त्रज्ज्ञ संशोधनातून नवनवीन माहिती देतात. जगात अनेक रहस्यमय घटना घडतात. जगामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. शास्त्रज्ज्ञ संशोधनातून याविषयी नवनवीन माहिती समोर आणत असतात. जीवन आणि मृत्यू याविषयीही अनेक गोष्टी आहेत ज्या अभ्यासातून समोर येत असतात. तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या दिवशी बहुतेक लोक जगाला निरोप देतात किंवा कोणत्या दिवशी लोकांचा मृत्यू होतो? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अशा गोष्टींवर कोणालाही आधीच माहित नसतं, मग हे नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

एका अभ्यासातून समोर आलं आहे की, सर्वाधिक मृत्यू कोणत्या दिवशी होतात. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून याविषयी समोर आलंय. आफ्टर लाइफ सर्व्हिसेस साइट ‘बियॉन्ड’च्या अभ्यासानुसार, ब्रिटनमध्ये मृत्यूचा सर्वात सामान्य दिवस 6 जानेवारी आहे. या अभ्यासानुसार, ख्रिसमस नंतरचा काळ मृत्यूच्या दृष्टीने सर्वात धोकादायक आहे हे सर्वात मोठं रहस्य आहे.

अभ्यासानुसार, 2005 पासून ब्रिटनमध्ये दररोज 1387 लोकांचा मृत्यू झाला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 6 जानेवारी रोजी मृतांची संख्या 1732 वर पोहोचली. 30 डिसेंबर ते 9 जानेवारी दरम्यान ब्रिटनमधील सर्वात धोकादायक दिवस आहेत. 11 दिवसांचा हा मध्यांतर मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक मानला जातो. नवीन वर्षाचा दिवस हा तिसरा सर्वात धोकादायक दिवस असल्याचंही या अभ्यासात म्हटलं आहे. या काळात होणाऱ्या मृत्यूला कडाक्याची थंडी कारणीभूत आहे. कारण यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे लोक सहजपणे आजारांच्या संपर्कात येतात.

डिसेंबर तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उत्तर गोलार्धात इन्फ्लूएन्झा रोगामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये वाढ दिसून येते, जी हिवाळ्याच्या हंगामात सर्वाधिक आढळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here