सोलापूर,दि.13: Monkey Video: माकडाचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. यात प्राण्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. माकडांना हनुमानाचं रुप मानलं जातं. त्यामुळे त्यांना प्रसाद खायला दिला जातो. माकडांना बजरंगबली म्हणून देखील म्हटलं जातं. एरवी माकडांच्या करामती, त्रास देतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. माकडाचा आता डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माकडाने भजन सुरू झाल्यावर… | Monkey Video
हा व्हिडिओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे छोला परिसरात जागरण सुरू असताना जवळच्या टेरेसवर बसलेल्या माकडाने अचानक नाचायला सुरुवात केली. लोकांची नजर त्याच्यावर पडताच त्याने व्हिडिओ बनवला.
बराच वेळ माकड तिथेच भजनावर ठेका धरून नाचताना दिसले. हे दृश्य पाहून लोक ‘हनुमान जी की जय’ म्हणू लागले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत.
काही जण याला धर्म आणि श्रद्धेची जोड देत आहेत, तर काही माकडांचा स्वभाव सांगत आहेत. भजनावर नाचणाऱ्या माकडाचा व्हिडीओ सगळ्यांनाच आवडला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि नेमका कुठला आहे याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.