मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय?

0

नवी दिल्ली,दि.29: मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करून मोठा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात परतताच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत सलग पाच तास बैठक घेतली. यामध्ये त्यांनी येत्या लोकसभा निवडणूक, समान नागरी कायदा (UCC) आदी मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मोदी सरकार घेणार मोठा निर्णय?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार मोठी खेळी खेळणार आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे त्याचा निवडणुकीवर होणारा परिणाम, राजकीय फायदा-तोटा याचा विचार केला जात आहे. या बैठकीत मोदी आणि शहांमध्ये वेगवेगळ्या धर्माच्या प्रमुख लोकांसोबत भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करतील असे ठरले आहे. हे नेते या लोकांना युसीसीवर राजी करतील, असे ठरले आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी युनिफॉर्म सिव्हिल कोडवर अध्यादेश आणण्यावरही विचार-विनिमय करण्यात आला. उत्तराखंड सरकार युसीसी बिल लागू करणार आहे, त्यावरही या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबतच 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही विचारमंथन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here