राजगढ़ दि.29: Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्य प्रदेशातील राजगढ येथील 73 समाजाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, त्यांचे अनेक विरोधक आहेत. एक दिवस माझीही विकेट पडणार आहे, पण तोपर्यंत मी हिंदुत्वाचा घरोघरी प्रवास पूर्ण करेन, असे ते म्हणाले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, तुम्हा लोकांची विभागणी करून सरकारला फायदा कसा होणार? फुटीरतावादी धोरणे करून राजकारण्यांना फायदा होतो. इंग्रज गेले, त्यांची बीजे उरली. (Dhirendra Krishna Shastri’s shocking statement)
धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? | Dhirendra Krishna Shastri
सर्वांना भीती वाटतेय म्हणून मी एक गोष्ट इथे बोलत आहे. माझ्या मागे विरोधक तर लागलेलेच आहेत. मला हे देखील माहितीय की बोल्ड आऊट व्हायचे आहे. परंतू, एका धीरेंद्र कृष्ण कोणी संपवेल तोपर्यंत आम्ही घरा घरात धीरेंद्र कृष्णाची यात्रा सुरुवात करू, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
हिंदू सनातन एकतेसाठी 73 समाजाचे लोक पुढे आले आहेत हे देशाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. याचे श्रेय सर्वप्रथम भारतातील राजगडला जाईल. त्यासाठी सर्व समाज एकत्र आले, तरच राष्ट्र निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतर धर्माचे लोक आपल्यातील वादांचा आनंद घेत आहेत. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले. सध्या हिच निती हे लोक वापरत आहेत. ते तुमचा लढा भडकवताहेत, असा आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे.