सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

0

सोलापूर,दि.9: सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी सरासरी पेक्षा खुप कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.

त्यामुळे शासनाने तात्काळ मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा. तसेच कमी पावसामुळे जनावरांच्या चारा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे गावांमध्ये पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पाण्याचे टँकर सुरू करणे व जनावरांच्या चारा छावण्यासह दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सुविधा तात्काळ मंगळवेढा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात याव्यात याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here