मुंबई,दि.२५: आजपासून आमदार अपात्र सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विलंबाबाबत कानउघाडणी केल्यानंतर आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज, सोमवारपासून (दि.२५) सुनावणी सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सुनावणीचे प्रारूप किंवा रूपरेषा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयास त्याबाबतचे वेळापत्रक सादर केले जाणार आहे. (MLA Disqualification Case)
आजपासून आमदार अपात्र सुनावणी | MLA Disqualification Case
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या सुनावणीला हजर राहण्यासाठी ठाकरे गटाच्या १४ तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठविली असून, दुपारी ३ पासून विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे.
सुनावणीत काय होईल?
दोन्ही गटांचे आमदार आपल्या
२-२ वकिलांसह उपस्थित राहतील.
अपात्रतेआधी पक्ष कुणाचा यावरच भर राहण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून जून २०२२ला अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दाच लावून धरला जाणार आहे.
शिंदे गटाकडे विधिमंडळात बहुमत असलेला पक्ष हा मुद्दा असेल.