छत्रपती संभाजीनगर,दि.१०: टीसीएस (TCS) आयटी कंपनीची माजी कर्मचारी आणि धर्मांतरण (Religious Conversion) तसेच लैंगिक शोषण (Sexual Exploitation) प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निदा खानला नारेगाव परिसरातील एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel)यांच्या घरातून अटक करण्यात आली. या मुद्द्यावरून आता शिवसेना (Shiv Sena), भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एमआयएमवर टीकेची झोड उठवली आहे.
मतीन पटेल यांच्या अवैध बांधकामावर महापालिकेची नोटीस
नगरसेवक मतीन पटेल यांचे घर, कार्यालय आणि ज्या ठिकाणी निदा खानला आश्रय देण्यात आला होता, ते बांधकाम पूर्णपणे अवैध आणि अनधिकृत (Illegal Construction) असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार (Maharashtra Municipal Corporation Act) महापालिकेने यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, मतीन पटेल यांच्या घरावर नोटीस डकवण्यात आली आहे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदत संपल्यानंतर चौथ्या दिवशी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरसेवक पदावर टांगती तलवार (Disqualification Risk)
शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका कायद्याचा दाखला देत मतीन पटेल यांचे पद धोक्यात असल्याचे सांगितले. जंजाळ यांच्या दाव्यानुसार:
“महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४७ च्या कलम १० (ड) नुसार, जर एखादा नगरसेवक किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाने अनधिकृत बांधकाम केले असेल, तर संबंधित नगरसेवकाचे पद रद्द होऊ शकते. हा नियम स्पष्ट असून पटेल यांचे पद १०० टक्के जाणार.”
पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप (Tampering with Evidence)
निदा खान प्रकरणात आतापर्यंत नऊ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत. निदा खानला तब्बल ४० दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवल्यामुळे या कालावधीत अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा संशय जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमचे नेते ओवेसी आणि इम्तियाज जलील हे आरोपींची पाठराखण करत असल्याचा आरोप करत, एमआयएमने आपली संशयास्पद भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘मुली बेपत्ता होण्यामागे एमआयएमचा हात?’ – जंजाळ यांचा सवाल
राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएमवर अत्यंत गंभीर आरोप करताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. शहरातून अनेक अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता (Missing) झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत, मात्र त्यांचा शोध लागलेला नाही. या प्रकरणांमागे एमआयएम आहे का? याची सखोल चौकशी (Investigation) करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून टीका
एमआयएमवर टीका करताना जंजाळ पुढे म्हणाले की:
• मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण असून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग (Blackmailing) केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आहेत.
• एमआयएमच्या एका नगरसेवकावर कलम ३०७ (Attempt to Murder) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, तर दुसरा एक नगरसेवक मुंबईतील ड्रग माफियांच्या (Drug Mafia) संपर्कात आहे.
“एमआयएम हा गुंड आणि विघातक कृत्य करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे,” अशा कडक शब्दांत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.








