भाजपाचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांचे मोठं वक्तव्य

0

जालना,दि.21: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील हे पाचव्यांदा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही त्यांची आग्रही मागणी आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली. दरेकर आणि इतर नेत्यांना मराठा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आरक्षणाविरोधात फूस लावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला?

नथ नसलेली मावशी

दरेकर तमाशातील नथ नसलेली मावशी आहेत. मला महिती आहे, दरेकर मला कसं बदनाम करणार आहेत? चल तुला काय करायचं कर, मी मरायला तयार आहे. तुझ्या डोक्यात फक्त एकच भूत घुसलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि सत्ता, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

एकही भाजपचा आमदार…

मनोज जरांगे म्हणाले, हे मला कधीही जेलमध्ये टाकू शकतात, निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर. महाराष्ट्रात एकही भाजपचा आमदार निवडून आला नाही पाहिजे. मला जेलमध्ये टाकलं म्हणून कोणी खचायच नाही, मी नसलो तरी यांचा कार्यक्रम लावायचा. जातीपेक्षा नेत्याला आणि पक्षाला मोठे मानणारे लय उतावळे आहेत. मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंपकपणा म्हणाले का?

तुम्ही लय मुजोर आहात. मी काय बोललो ते ऐकत जा दरेकर. लाडकी बहिण योजना चांगली आहे, असं म्हणलो मी. पण ती आता नव्हती पाहिजे, अस म्हणलो मी. दरेकर तुम्हाला काही कळत नाही, तुमचं लेकरू असत तर किती वाईट वाटलं असत, तुमच्यावर थुकत पण नाही आम्ही. समस्त महाराष्टातील मराठा समाजातील मुलांचा अपमान केलाय. जत्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं वाटू नका, आयुष्यभराचं द्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here