आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना या अटींवर जामीन मंजूर

0

नवी दिल्ली,दि.9: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मनीष सिसोदिया 17 महिन्यांपासून तिहार तुरुंगात होते.

कथित दारू घोटाळ्यातील खटला सुरू होण्यास होत असलेला विलंब पाहता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंग क्रमांक-1 मध्ये बंद आहेत. तिहारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जामीन आदेश तुरुंगात येतो, जामीनदार येतात आणि जामीन बॉण्ड भरला जातो, तेव्हा त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होईल. 

या अटींवर जामीन

मनीष सिसोदीयांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने 4 अटी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये पहिली अट म्हणजे त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारे पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही. तिसरी अट सिसोदियांना आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तर चौथी म्हणजे 10 लाखांच्या खासगी मुचलका भरावा लागणार आहे.

उत्पादन शुल्कात अनियमितता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदियांना जामिन दिल्यानंतर त्यांचे वकिल ऋषिकेश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तुमच्याकडे पुरावा आहे तर त्यात छेडछाडीचा संबंध येत नाही. तुम्ही यांना इतका काळ तुरुंगात ठेवलंय हे जामिनाच्या सिद्धांतांच्या विरोधात आहे. ईडीचे प्रकरण असो वा कलम 45 तेथे जामिनाला मुख्य नियम लागू होते. हे ध्यानात घेऊन सिसोदिया 17 महिने तुरुंगात राहिले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने ईडीचे आक्षेप फेटाळले आणि सिसोदियांना जामीन दिला.  सिसोदियांचे ट्रायल 6 ते 8 महिन्यात संपेल असे ईडीने कोर्टात म्हटलंय पण तसे वाटत नसल्याचे कोर्टाने सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here