सोलापूर,दि.५: महाकुंभ मेळाव्यात करोडो भाविकांनी अमृत स्नान केले आहे. अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीही महाकुंभ मेळाव्यात अमृत स्नान केले आहे. इंगळे यांनी वसंत पंचमीच्या ब्रह्ममुहूर्तावर त्रिवेणी संगमावर शाही अमृत स्नान केले.
हरिद्वारचे स्वरयोग पीठाधिश्वर श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी चरणश्रित गिरी महाराजांच्या दिव्य सान्निध्यात व करोडो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी हा सोहळा पार पडला. महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, अंकूश केत, श्रीकांत झिपरे, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, सुरेश वाले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, मनोज इंगुले, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, धनराज स्वामी, स्वामीनाथ मुसळे यांनी गिरी महाराजांच्या आखाडा नियोजनानुसार विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. महाराजांच्या आखाड्यात लंगर भोजन प्रसाद व गिरी महाराजांच्या आशिर्वचनाचा लाभ घेतला.
याप्रसंगी महेश इंगळे यांनी स्वामी चरणश्रित गिरी महाराजांचा व साध्वी साधकांचा स्वामींचा कृपावस्त्र, प्रसाद देऊन सन्मान केला तर स्वामी चरणश्रित गिरी महाराजांनी देखील महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतरांचा रुद्राक्ष, प्रसाद, देवून सत्क्रार केला.
५८ किलोमीटर पायी वारी
कुंभमेळ्याला उपस्थित राहून शाही स्नान सोहळ्यात सहभागी होण्याचा अम्रुत योग लाभला. ५८ किलोमीटर पायी वारी करून पहाटे सहा वाजता त्रिवेणी संगमावर पोहोचलो. भुपेंद्र शर्मा, भुपेंद्र कुमार, रामकुमार, हवालदार जयंता देवरी, अक्कलकोटचे हवालदार अमोल माने यांनी सहकार्य केले. त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून सत्कार केला. महेश इंगळे