सोलापूर,दि.21: सोलापूर जगत ज्योती मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने बसव जयंती दिवशी सोलापूर महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये जन्म घेतलेल्या मुला मुलींच्या नावाने बसव ठेव योजना बँक सर्टिफिकेटचे वाटप सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांच्या हस्ते जन्मदात्या मुला मुलींचे पालकांना बसव ठेव योजनेचे बँक डिपॉझिट सर्टिफिकेट यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने आयोजन
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल डॉ. सुनिता देवगावकर,डॉ. लता पाटील, डॉ. शिवकांची चिप्पा, यांची उपस्थिती होती.
मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे म्हणाले की सोलापूर मधील चांगली योजना सर्वसामान्यांना मदत देण्याची आहे मध्यवर्तीने अनावश्यक खर्च टाळून हा सामाजिक उपक्रमचे बोध सगळ्या समाजाने घेण्यासारखा आहे.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी खजिनदार अनिल परमशेट्टी,गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती, उपाध्यक्ष संतोष केंगनाळकर, मल्लिनाथ सोलापुरे गुरुशांत मोकाशी, अभिजीत चिडगुंपी, विकास कस्तुरे, रोहित इटगी, प्रदीप वेदपाठक यावेळी मंडळाचे कार्यकारी व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चिंचोळी,सूत्रसंचालन सचिन शिवशक्ती व आभार संतोष केंगनाळकर यांनी केले.