मुंबई,दि.17: Uday Samant On Ajit Pawar: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतेच 15 दिवस वाट पाहा, मग काय होते ते कळेल असं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चेवर भाष्य केले होते. राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
उदय सामंत यांचे सूचक विधान | Uday Samant On Ajit Pawar
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा भूकंप होणार अशा बातम्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच ‘शक्यता जर सत्यात उतरली तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. जर करेक्ट कार्यक्रम करत असताना माझी काही गरज लागली तर मी करेन, पण कार्यक्रम तेच करतील’ असं सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
अजित पवार यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्यांना ऊत आला आहे. याच मुद्यावर उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

मविआवर टीका | Uday Samant
एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनी वरळीमध्ये शिवसेना आणि भाजपची अशी सर्व पदाधिकाऱ्यांची सभा होईल. संध्याकाळी सहा वाजता ही सभा असेल. महाविकास आघाडी ज्या ठिकाणी सभा करते ते सर्व मंडपवाले माझ्या संपर्कात आहेत. दहा हजार खुर्च्या लावून एक लाख गर्दी झाली असे ते सांगतात, असा टोलाही सामंत यांनी मविआला लगावला.
काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. आप्पासाहेब यांना हा पुरस्कार दिला. परंतु, दुर्दैवाने उष्माघातामुळे काही जणांचा मृत्यू झाला. परंतु विरोधक दुर्दैवाने टीका टिपणी करत आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असा खुलासाही सामंत यांनी केला.