Home महाराष्ट्र Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

0
Maharashtra Rain Update

मुंबई,दि.१९: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. (Maharashtra Rain Update) जुलैच्या सुरुवातीला राज्यभर चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. (Rain Alert Maharashtra)

भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः नाशिक, पुणे घाटमाथा आणि सातारा या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rain Maharashtra)

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नागपूर, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. (Yellow Alert Maharashtra)

अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, बीड, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. (Thunderstorm Alert Maharashtra) अनेक ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या ते मध्यम सरीही कोसळल्या आहेत.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Kharif Crop Rain Benefit) पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

परभणी जिल्ह्यातही दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. (Parbhani Rain Update) त्यामुळे दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळल्याचे दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. (Monsoon Forecast Maharashtra)

एकूणच, पावसाचे हे कमबॅक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, आगामी काही दिवस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. (Monsoon News Maharashtra)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.