Maharashtra Rain Update | महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा पावसाचा इशारा 

0
Maharashtra Rain Update

मुंबई,दि.१६: Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  16 मे ते 20 मे 2025 दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन होण्याआधीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे उकाडा वाढणार आहे. (Rain Alert News Marathi)

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. पुढचे 4-5 दिवस ढगांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Alert)

Maharashtra Rain Update

हवामान खात्याच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा चमकत असताना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

पावसाचा यलो अलर्ट | Maharashtra Rain Update 

मुंबईत 16 मे रोजीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोलापूरसह या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा इशारा | Maharashtra Rain Alert

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, रत्नागिरी, पुणे, सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 16 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here