छगन भुजबळ यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य 

0

पुणे,दि.28: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता असतानाच भुजबळ यांनी फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी मागणी केली आहे तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या नावाचा तिढा आता सुटला आहे. पुण्यात बोलत असताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

भुजबळ म्हणाले, भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं आहे. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. याआधी फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

अजित दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं आहे. पण यावेळी भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल, फडणवीस झाले तरी आनंदच होईल. मनोज जरांगे पाटील यांनी जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं असे भुजबळ म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here