मंत्रीमंडळ विस्तार: भाजपाकडे राहणार ही खाती तर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला…

0

मुंबई,दि.15: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज महाराष्ट्रात विस्तार होणार आहे. शपथविधी सोहळा दुपारी 4 वाजता होणार असून त्यात 39 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ताब्यात असलेले गृह खाते भाजपच्या खात्यातच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने गृह, महसूल, पाटबंधारे आणि शिक्षण ही खाती स्वत:कडे ठेवली असली तरी या मंत्रिपदांची जबाबदारी कोणाकडे राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली असून, तेथेच तयारी सुरू आहे. भाजपच्या खात्यातून 20 आमदार मंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे पण पक्ष काही मंत्रीपदं रिक्त ठेवू शकतो. याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातील 13 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 10 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

काय मिळणार राष्ट्रवादी-शिवसेनेला?

नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी, मराठी भाषा आणि एमएसआरडीसी या खात्यांची जबाबदारी शिवसेनेकडे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्थ, सहकार आणि क्रीडा ही खाती राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांकडून या मंत्रिपदाची जबाबदारी कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय गृह, महसूल, वीज, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण आणि सिंचनाची जबाबदारी भाजपने स्वतःकडे ठेवली आहे.

भाजपाचे मंत्रीपदाची शपथ घेणारे आमदार 

1) चंद्रशेखर बावनकुळे

2) नितेश राणे

3) शिवेंद्रराजे भोसले

4) चंद्रकांत पाटील

5) गिरीश महाजन

6) पंकजा मुंडे

7) जयकुमार रावल

8) राधाकृष्ष विखे-पाटील

9) गणेश नाईक

10) पंकज भोयर

11) मेघना बोर्डिकर

12) माधुरी मिसाळ

13) अतुल सावे

14) आकाश फुंडकर

15) अशोक उईके

16) आशिष शेलार

17) मंगलप्रभात लोढा

18) जयकुमार गोरे

19) संजय सावकारे

हे आमदार  शिवसेनेच्या कोट्यातून शपथ घेणार

उदय सामंत, कोकण  

शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र

गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र

दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र 

संजय राठोड, विदर्भ 

संजय शिरसाट, मराठवाडा 

भरतशेठ गोगावले, रायगड

प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र

योगेश कदम, कोकण 

आशिष जैस्वाल, विदर्भ

प्रताप सरनाईक, ठाणे 

हे आमदार राष्ट्रवादीच्या कोट्यातून शपथ घेणार

राष्ट्रवादी मंत्री

आदिती तटकरे

बाबासाहेब पाटील

दत्तमामा भरणे

हसन मुश्रीफ

नरहरी झिरवाळ


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here