पुणे,दि.15: Ajit Pawar: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. कर्नाटकात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. कर्नाटक निकालानंतर तातडीने शरद पवार यांनी सर्वांना बोलावलं असं अजित पवार यांनी सांगितलं. संजय राऊत, नाना पटोले यांनी आधीच माहिती दिली असल्याचंही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar
2014 सालापासून काही राज्यांचा अपवाद वगळता मोदी यांचं सरकार आलं. यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह पाहायला मिळायचा. कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचा पण निकाल फेल ठरला. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी कर्नाटक निकालावर दिली.
2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची प्लॅनिंग कशी असली पाहिजे? तसंच वज्रमुठ सभेबद्दल चर्चा झाली. आगामी निवडणूकसाठी महाविकास आघाडी म्हणून 48 जागांचं वाटप करावी अशी चर्चा झाली. पुन्हा निवडणुका लागल्यावर घाई नको. जागा वाटप झाल्यावर काही नाव तिन्ही पक्ष देतील आणि सहा लोकं बसून कश्या जागा वाटप करायचं यावर चर्चा करू. केवळ मविआ नाही तर जे आमचे समर्थक पक्ष आहेत त्यांचाही समावेश आम्ही करून घेऊ असंही अजित पवार म्हणाले.
अलीकडे सायबरचे गुन्हे वाढलेले आहेत…
राज्यात काही ठिकाणी दंगलीचे प्रकार दोन गटांमध्ये घडले आहेत. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, अलीकडे सायबरचे गुन्हे वाढलेले आहेत. कोणी क्लिप व्हायरल केली यासागळ्याच्या खोलात तातडीने गेलं पाहिजे. काही शहरांमध्ये वातावरण तणावाचे आहे हे ऐकायला मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित ठेवायचं काम राज्य सरकारचा आहे.
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हटलं की, त्या कार्यकर्त्याला मीच तयार केलं होतं. स्थानिकांशी त्याचं काही जमत नव्हतं. त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना समाजात मान, सन्मान आहे. माझ्या परीने मी शक्ती, ताकद द्यायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने आम्ही काही करू शकलो नाही. मध्यंतरी इन्कम टॅक्सची धाड पडली होती.