भोपाल,दि.24: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी दुपारी दोन गटामध्ये काठ्या-तलवारीचा वापर झाला. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली. या संपूर्ण दंगलीत सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. परिस्थिती लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जहांगीराबाद भागात दोन दिवसांपूर्वी शीख आणि मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वादाची परिस्थिती निर्माण झाली. दगडफेकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
प्रकरण 22 डिसेंबरच्या संध्याकाळचे आहे. फैज नावाचा व्यक्ती दुचाकीवरून सरदार गली येथून भरधाव वेगात जात होता. यावरून हाणामारी झाली आणि फैज याने भाजीच्या गाडीतून चाकू काढून सरदार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून फैज तुरुंगात आहे.
ही जागा भोपाळच्या जहांगीराबाद भागातील जुनी गल्ला मंडी आहे. जिथे शीख आणि मुस्लिम समाजाचे लोकमोठ्या प्रमाणात राहतात.
आज मंगळवारी सकाळी शीख समुदायाचे लोक जमले आणि त्यांनी मुस्लिम समाजातील मायकल नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला.
यानंतर शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये जमा झाले. जिथे पोलीस-प्रशासनाने त्यांना समजावले. यानंतर परिस्थिती शांत आहे.
पोलिस दोन्ही बाजूंनी कारवाई करत आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून तलवारबाजी आणि दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.